मानव्यविद्या शाखांमधील संशोधन
१. समाज समजून घेण्यासाठी
मानव्यशास्त्राचे महत्त्व व संशोधनाची गरज
मानव्यशास्त्र (इतिहास, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, भाषा आणि संस्कृती) हे शास्त्र माणसाच्या जीवनशैली, विचारप्रवाह, परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक बदलांचा सखोल अभ्यास करतात.
• इतिहास आपल्याला समाजाचा प्रवास, संघर्ष व उत्क्रांती समजावतो.
• समाजशास्त्र आपल्याला सामाजिक संस्था, नातीगोती आणि बदल यांचे विश्लेषण करून देतो.
• तत्त्वज्ञान मानवी विचारांची मुळे आणि प्रश्न शोधून काढतो.
• साहित्य व भाषा समाजाच्या भावभावना, अनुभव आणि विचार परंपरा जपतात.
• संस्कृती आपल्याला परंपरा, कला, श्रद्धा आणि जीवनपद्धतींची जाण करून देते.
संशोधन हे या सर्व क्षेत्रांचे केंद्रबिंदू आहे. संशोधनाशिवाय समाजाची खरी पार्श्वभूमी, त्यातील विसंगती, प्रगतीचे टप्पे आणि भविष्याचा मार्ग समजत नाही.
म्हणूनच, मानव्यशास्त्रातील संशोधन हे केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातूनच नाही तर सामाजिक वास्तव समजून घेण्यासाठी, धोरणे ठरवण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी अत्यावश्यक आहे.
मानव्यशास्त्रातील विविध विषयांचा अभ्यास करताना अनेक विशिष्ट अंगांनी सखोल संशोधन करण्याची संधी उपलब्ध आहे. MHKC (Maharashtra Knowledge Center) विद्यार्थ्यांना व संशोधकांना या संधी अधिक सुलभ करण्यासाठी शोधसेतू हे पोर्टल उपलब्ध करून देत आहे.
या पोर्टलवर अनेक संशोधनविषयक संकल्पना दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ:
• जत्रा व लोकसंस्कृती: महाराष्ट्रातील जत्रांचा सर्वांगीण अभ्यास करता यावा म्हणून ३० वेगवेगळे उपविषय मांडलेले आहेत. यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय असे विविध दृष्टिकोन समाविष्ट आहेत.
• महिला विषय: ग्रामीण, शहरी, आदिवासी आणि राजकीय क्षेत्रातील महिलांचे प्रश्न व त्यांची भूमिका या संदर्भात वेगवेगळे संशोधनविषय ठेवलेले आहेत.
• सहकारी संस्था: महाराष्ट्र सहकार चळवळीमुळे ओळखला जातो. म्हणूनच सहकार क्षेत्राशी निगडित एक संक्षिप्त पण महत्त्वपूर्ण विषयही सुचवलेला आहे. या विषयावर अधिक विस्ताराने संशोधन करून नवे प्रकल्प तयार करता येतील.
२. सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी
भारतीय समाजात लोकपरंपरा, साहित्य, कला, नृत्य, संगीत यांचा अमूल्य ठेवा आहे. या वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी संशोधन हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. संशोधनामुळे हा सांस्कृतिक ठेवा व्यवस्थितपणे नोंदवून ठेवता येतो आणि पुढील पिढ्यांपर्यंत तो शास्त्रशुद्ध पद्धतीने पोहोचवता येतो.
इतिहास हा विषय केवळ भूतकाळाचा आढावा घेण्यासाठी नसून पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे. त्यामुळे खरा आणि सखोल इतिहास सतत लोकांसमोर येणे आवश्यक आहे.
साहित्य, कला, नृत्य आणि संगीत यांचा अभ्यास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो. हे केवळ अभिव्यक्तीचे साधन नसून समाजाची विचारसरणी, संस्कृती, आणि सामूहिक भावना समजून घेण्यासाठी प्रभावी माध्यम आहे.
तसेच, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यासही अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजातील बदल, व्यक्तींच्या मानसिकतेतील घडामोडी, आणि आर्थिक विकासाचे प्रवाह समजून घेण्यासाठी या विषयांवरील संशोधन पुढील पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरते.
३. सामाजिक समस्यांवर उपाययोजना व मानव्यशास्त्रातील संशोधनाचे महत्त्व
गरिबी, असमानता, लिंगभेद, शिक्षणातील तफावत, अंधश्रद्धा, पर्यावरणीय प्रश्न अशा अनेक सामाजिक समस्या आजच्या समाजासमोर उभ्या आहेत. या समस्या सखोलपणे समजून घेऊन त्यावर परिणामकारक उपाययोजना सुचवण्यासाठी संशोधन करणे आवश्यक ठरते.
लोकांच्या अडचणी व गरजा समजून घेण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. अशा सर्वेक्षणातून मिळालेली माहिती पुढील योजनांची आखणी करण्यासाठी सरकारी पातळीवर महत्त्वाची ठरते. त्यामुळे हे संशोधन केवळ शैक्षणिक दृष्ट्या नव्हे तर सामाजिक संस्था आणि सरकारी कामकाजासाठीही अनिवार्य ठरते.
या प्रकारचे संशोधन करताना –
• भौगोलिक परिस्थिती
• विषयातील माहिती व समज
• सामाजिक परिवर्तनाचे प्रवाह
• आर्थिक बदल
यांचा अभ्यास सखोलपणे होतो.
सामाजिक संस्था अथवा सरकारी कामाचे परिणाम समजून घेण्यासाठी मानव्यविद्या शाखेतील संशोधन उपयोगी ठरते. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या समस्यांवर उपाययोजना आखण्यासाठी अशा संशोधनातून मिळणारे निष्कर्ष सरकार व सामाजिक संस्थांना दिशादर्शक ठरतात. त्यामुळे गरजेनुसार प्रकल्प सुरू करणे अधिक सोपे होते.
४. जागतिकीकरण आणि सामाजिक संशोधनाची गरज
जागतिकीकरण, तंत्रज्ञान, स्थलांतर, सामाजिक माध्यमे यामुळे मानवी जीवनशैलीत मोठे बदल होत आहेत. या बदलांचा अभ्यास संशोधनातूनच शक्य होतो आणि त्यातून समाज नव्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम होतो.
आज जागतिकीकरणाच्या रेट्यात प्रत्येक व्यक्ती काही प्रमाणात भरडली जाते. त्यामुळे सर्व स्तरातील लोकांना समान संधी मिळाव्यात, बदलत्या जीवनशैलीचे परिणाम ओळखावेत यासाठी सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञानामुळे माणसे जवळ येत असली तरी त्याचे एकटेपणाचे दुष्परिणाम सर्वदूर दिसत आहेत. त्यामुळे माणसांना पुन्हा पर्यावरणाशी जोडणे, निसर्गाचे फायदे समजावून सांगणे, आणि एकत्रित राहण्याचे व संघटित होण्याचे फायदे पटवून देण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे.
बदललेल्या सामाजिक मूल्यांमध्येही आपल्या प्राकृत मूल्यांना धरून संस्कृती टिकवणे महत्त्वाचे आहे. यासाठी संशोधन उपयुक्त ठरते.
• युवा : सामाजिक प्रश्न व वर्तणुकीतील समस्या वाढताना दिसतात. त्यावर उपाययोजना करण्यासाठी संशोधनाची गरज आहे.
• वृध्द : एकटेपणावर मात करण्यासाठी व योग्य सुविधा देण्यासाठी संशोधन मार्गदर्शक ठरते.
महिला व बालविकास यांसारख्या शासकीय विभागांसाठी अशा संशोधनाचे महत्त्व विशेष आहे. आरोग्याच्या दृष्टीने ग्रामीण आणि शहरी भागातील तफावत, सुविधा, व गरजा समजून घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीही संशोधन आवश्यक आहे.
याशिवाय, शेती, मासेपालन, इतर सरकारी योजना, त्यांचा समजावर होणारा परिणाम मोजण्यासाठी, यांसारख्या क्षेत्रातील समस्या जाणून त्यावर उपाय सुचवण्यासाठीही संशोधनाचा मोठा उपयोग होऊ शकतो.
६. मानवी मूल्यांचे जतन करण्यासाठी
मानव्य शास्त्र संशोधनातून समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, सहिष्णुता यांसारखी मूल्ये अधोरेखित होतात. यामुळे समाज अधिक संवेदनशील व न्याय्य बनतो.
मानव्यशास्त्रातील संशोधनातून समानता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, सहिष्णुता यांसारखी मूल्ये अधोरेखित होतात. या मूल्यांमुळे समाज अधिक संवेदनशील, जागरूक व न्याय्य बनतो. म्हणूनच संशोधन ही काळाची गरज आहे. मानवातील मूलभूत मूल्ये जपण्यासाठी अशा प्रकारचे संशोधन करणे अत्यावश्यक आहे.
संशोधन पद्धतींमध्ये सर्वेक्षण पद्धती विशेष महत्त्वाची ठरते. समाजात प्रत्यक्ष वावरताना, लोकांच्या सहभागातून आणि निरीक्षणांवर आधारित सर्वेक्षणामुळे समाजातील विविध प्रवृत्तींचा अभ्यास सखोलपणे करता येतो.
ह्या लेखातून एक विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्र, तंत्रज्ञान ह्या विषयी संशोधन करताना समाजाच्या सर्व घटकांचा विचार असतोच असे नाही. किंवा ह्या विषयातील संशोधन समाज मनात परिणामकारक बदल घडवून आणू शकतात.